जाहिरात
गडचिरोली

गडचिरोलीतील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मदतीचा हात

जीवनावश्यक वस्तूंसह आ. रोहित पवार थेट पूरग्रस्तांच्या भेटीला

Spread the love

गडचिरोली (दि,२० जुलै)

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे येथील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवण्यासाठी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे जीवनावश्यक वस्तूंसह थेट अहेरी व सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या भेटीला आले होते.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था ही सामाजिक संस्था विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असते. तसेच विविध प्रकारे ते नागरिकांना मदत करत असतात. यावेळीही गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी आमदार रोहित पवार यांची बारामती ॲग्रो कंपनी व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत अहेरी व सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना करण्यात आली. यावेळी स्वतः आमदार रोहित पवार हे देखील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तिथे उपस्थित होते.

दरम्यान, “आपली माणसं संकटात असताना शक्य ती मदत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, त्यानुसार दुर्गम भागात अन्नधान्य, औषधे, कपडे, पिण्याचं पाणी या जीवनावश्यक वस्तू पोचवणं गरजेचं आहे. यात खारीचा वाटा म्हणून मी सिरोंचा आणि अहेरी या तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत सुपूर्द केली” असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून मदत पोचवली होती. तसेच आरोग्य, शिक्षण, उद्योग, नोकरी अशा विविध क्षेत्रात ते नेहमीच हिरीरीने कार्य करत असतात.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button