जाहिरात
गडचिरोली

पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या सामाजिक संस्था, संघटना.

Spread the love

गडचिरोली (१९ जुलै)

मागील ८ दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असल्याने सोबतच गोसेखुर्द व मेडिगट्टा प्रकल्पाचे दरवाजे खुले केल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती तयार झाली. अनेक गावे पाण्यात बुडाली व मोठ्या प्रमाणात गाव खेड्यात पाणी शिरून घरांचे व लोकांचे आर्थिक नुकसान झाले. ह्याच गोष्ठीची दखल घेत सामाजिक जाण म्हणून राज्यातील काही सामजिक संस्था व संघटनाच्या माध्यमातून #HelpGadchiroli अभियान राबवून शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली, लेजेंड्स क्लब पुणे
द स्ट्रेंथ ऑफ युनिटी नागपुर यांच्या पुढाकाराने स्वराज्य फौंडेशन आलापल्ली, टायगर ग्रुप आलापल्ली व इतर सामजिक संस्था व संघटनेच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवून पूरग्रस्तांच्या मदती करिता ऑनलाईन पद्धतीने लोकवर्गणी मराठी रिट्विट, Gadchiroli_ig व मी गडचिरोलीकर या सोशल मिडिया अकाऊंट च्या सहयोगाने जमा करन्यात आली. जमा झालेल्या मदत राशीतून अहेरी उपविभागतील गोल्लाकर्जी, निमलगुडम, गुड्डीगुडम, या चार अति पूरग्रस्त भागात जीवणावश्यक वस्तूनी तयार ७५ हुन अधिक किट चे वाटप स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामध्ये भाजीपाल्या पासून किराणा सामान पर्यंतच्या बऱ्याच वस्तूंचा समावेश होता.
ह्या अभियानात विशेष पुढाकार शिवकल्याण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे, मी गडचिरोली ट्विटर चे संचालक मयुर गावतुरे, स्वराज्य फौंडेशन चे अध्यक्ष कुणाल वर्धलवार आणि त्यांची टीम ने घेऊन गरजूंना कठीण समयी मदत केले. परिणामी त्या गावातील नागरीकांनी अश्या वाईट वेळेत तुम्ही येऊन भेट घेतली हेच आमच्यासाठी आनंदाची गोष्ठ आहे असे बोलून समाधान व्यक्त केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button