गडचिरोलीब्रेकिंग न्युज
सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत महिला ठार पती जखमी, संतप्त जमावाने पेटविले८ ते १० ट्रक
गडचिरोली /मुलचेरा(२७ सप्टेंबर)
सदरची घटना आष्टी आलापल्ली महामार्गावर लगाम,शांतिग्राम गावाजवळ झाली असून सुरजागड पहाडी वरील लोहखनिजाजी वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकी स्वाराला धडक दिली त्यात महिला जागीच ठार झाले असून तिचा पती गंभीर जखमी आहे. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
ठार झालेल्या महिलेचे नाव आहे बिजोली जयदार रा. कांचनपुर ता. मुलचेरा जि.गडचिरोली तर जखमी पतीचे नाव आहे सुभाष जयदार या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने ८ ते १० ट्रकला आग लावून पेटविल्याची घटना घडली आहे त्यामुळे सुरजागड प्रकल्प पुन्हा एकदा नव्या वादात आला आहे. मृतकाच्या घरी शोककळा पसरलेली आहे .
मृतक मूलचेरा तालुक्यातील असल्याने तालुक्यात तणावसदृश परिस्थिती तयार झाली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पांगवण्यासाठी अहेरी पोलिसांची टिम घटनास्थळी रवाना झाली आहे.
जाहिरात
