गडचिरोली जिल्ह्याला आले बेटाचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत
अनेक रस्ते पुराच्या पाण्याने बंद

गडचिरोली (दि,१६ ऑगष्ट)
वैनगंगा नदी वरील संजय सरोवर, गोसीखुर्द प्रकल्प,चिचडोह बरेंज,मेडीगट्टा प्रकल्पाचे पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भामरागड तालुक्यातील१५० नागरीकांना व देसाईगंज वार्डातील ४३ नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आत्तापर्यंत आलेल्या पुरात ७५ कच्ची घरे व २ गोट्याची नुकसान प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे .
रस्त्याच्या चारही दिशेला प्रमुख महामार्गावर लांब जाणाऱ्या अवजड वाहनांची (ट्रक,बसेस,) रांग उभी असल्याचे चित्र होते.

या वर्षातील हा पाच ते सहावा आलेला पुर आहे. हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली..
प्रमुख महामार्ग बंद
👇👇
गडचिरोली -आरमोरी, गडचिरोली- चामोर्शी, आरमोरी- ब्रह्मपुरी, वडसा- ब्रह्मपुरी, वडसा- लाखांदूर, आष्टी- आलापल्ली, आष्टी – गोंडपिपरी अशी प्रमुख महामार्ग आज बंद आहेत.

नागरिकांची मागणी
👇👇
भविष्यात अशा पुरापासून धोका निर्माण होऊ नये व रहदारी चालू राहावी, जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना परिपुर्ण मदत करून अर्थसहाय्य करावे.
पुराचे पाणी बघणाऱ्यांची एकमेव व गर्दी

