धानोरा (१४ जुलै)
नागपुर वरुण धानोरा येथे येत असलेल्या ट्रॅव्हल्सची रस्त्यावर वाकलेल्या झाडास धडक झाली यामध्ये कंडक्टर जखमी झाला. सदर अपघात धानोरा – गडचिरोली मार्गावर १३ जुलै रोजी काकडवेली गावाजवळ रात्रौ १० वाजताचे सुमारास झाला. गडचिरोली येथिल एम. एच. ४९ टि. १५८१ क्रमाकाची साई ट्रॅव्हल धानोरा येथे मुक्कामी राहत असुन ती नागपूर येथे जाउन रात्री परत धानोरा येथे येत होती सध्या सततच्या पावसामुळे झाडाची मुळे खिळखिळी झाल्याने रस्त्याचे कडेचे एक झाड रस्त्यावर अर्धवट झुकले होते. भरधाव वेगात येत असलेल्या ट्रॅव्हल्स चालकास रात्री लाईटच्या प्रकाशात झाड न दिसल्याने झाडाला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रॅव्हल्स मधिल कंडक्टर जखमी झाला सुदैवाने गाडीत प्रवाशी नसल्याने जिवितहाणी टळली मात्र गाडीचे नुकसान झाले या अपघातामुळे धानोरा – गडचिरोली मार्ग रात्रभर बंद होता तो सकाळी झाड तोडून खुला करण्यात आला . गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार वादळी पाऊस सुरू आहेत या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग झाड पडल्याने बंद झालेले आहेत . गडचिरोलीत रेट अलर्ट केल्यामुळे संबंधित चालकाने ट्रॅव्हल्स ही कमी वेगाने चालवणे अपेक्षित आहे सुदैवाने धानोरा येथे एकही प्रवासी या प्रवास मध्ये नसल्यामुळे मोठी जीवित हानी कळली आहे .
जाहिरात
