जाहिरात
आरोग्य

गडचिरोली : स्त्रीरोग शस्त्रक्रियेची मोठी कामगिरी 

१.८ किलो वजनाचा फायब्रॉइड काढण्यात आले यश

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १९ नोव्हेंबर)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोलीच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात दोन वेगवेगळ्या महिलांवर अत्यंत आव्हानात्मक व उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यांना नवा श्वास मिळाला आहे. दुर्गम आणि संसाधनांच्या तुलनेने मर्यादित परिस्थितीतही इतक्या दर्जेदार सेवा देण्यात विभागाने दाखवलेली क्षमता कौतुकास्पद ठरली आहे.

पहिल्या प्रकरणात, ४६ वर्षीय महिला दीर्घकाळापासून गंभीर अतिस्राव या त्रासाने मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून गेली होती. वारंवार अशक्तपणा, कमजोरी आणि दैनंदिन जगण्यावर परिणाम यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास खालावत होता. परिस्थितीतून दिलासा देण्यासाठी दूरबीन द्वारे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद पुनर्वसन यामुळे रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर मोठा दिलासा व्यक्त केला.

दुसऱ्या प्रकरणात, विभागासमोर आणखी मोठे आव्हान उभे राहिले. २२ आठवड्यांच्या आकाराचा प्रचंड फायब्रॉइड गर्भाशय आणि त्यासोबत तीव्र अशक्तपणा असलेल्या रुग्णावर एक्सप्लोरेटरी लॅप्रोटॉमी करणे ही अत्यंत धाडसी आणि सजग निर्णयक्षमता मागणारी प्रक्रिया होती. शस्त्रक्रियेच्या दरम्यान तब्बल १.८ किलो वजनाचा महाकाय फायब्रॉइड काढण्यात आला. जटिलता, रक्तस्रावाचा धोका आणि रुग्णाची एकूणच नाजूक प्रकृती लक्षात घेता हा संपूर्ण प्रयत्न अत्यंत नियोजनबद्ध, समन्वयित आणि कुशलतेने पार पाडण्यात आला. रुग्णाची सुरक्षित अवस्था आणि यशस्वी परिणामामुळे कुटुंबीयांनीही मोठा दिलासा व्यक्त केला.
दोन्ही रुग्ण सध्या स्थिर असून, शस्त्रक्रियेनंतरच्या त्यांच्या समाधानातून वैद्यकीय टीमच्या प्रयत्नांची झलक दिसून येते.

या यशस्वी कार्यासाठी विभागाने—अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पेन्दाम, डॉ. प्रसाद बन्सोड, तसेच शस्त्रक्रिया करणारे डॉ. प्रदीप बिस्वास आणि त्यांची समर्पित टीम—यांचे मार्गदर्शन, शिस्तबद्ध कार्यपद्धती, तांत्रिक कौशल्य आणि सततचा समन्वय याबद्दल मन:पूर्वक आभार मानले.

या शस्त्रक्रियांनी हे पुन्हा सिद्ध केले आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली दुर्गम भागासाठी आधुनिक, सुरक्षित आणि उच्च दर्जाची स्त्रीरोग शस्त्रक्रिया अगदी विश्वासाने व निश्चिंतपणे उपलब्ध करून देत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button