जाहिरात
दुःखद ब्रेकिंग न्युज

गडचिरोली : ट्रॅकच्या धडकेत ४ ठार २ गंभीर जख्मी

मृतकाच्या परिवाराला राज्य सरकारची ४ लाखाची मदत

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.७ ऑगस्ट)

गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय
महामार्गावरील गडचिरोली मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली नजीक गुरुवार ७ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३० ते ५:०० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव मालवाहू ट्रकने ६ बालकांना चिरडल्याने २ जागीच ठार झाले असून दोघे २ गडचिरोली रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत पावले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असुन पुढील उपचारासाठी नागपूर येथे हेलिकॉप्टरने हळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मृतकांची नावे अनुक्रमे १)टिंकू नामदेव भोयर (वय १४), २)तन्मय बालाजी मानकर (वय १२), ३) दिशांत मेश्राम(वय १३) ४) तुषार मारबते (वय १२) यांचा मृत्यू झाला.आदित्य कोहपरे, क्षीतिज मेश्राम सर्व रा. काटली हे दोघे गंभीर जख्मी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, टिंकू भोयर, तन्मय मानकर, क्षितिज मेश्राम, आदित्य कोहपरे, दिशांत मेश्राम, तुषार मारबते सर्व राहणार काटली ता.जि. गडचिरोली हे सहाही जण पहाटेच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी आरमोरी मार्गावर गेले होते. काटली येथील नाल्याजवळ व्यायाम करीत असताना पहाटे ४:३० ते ५:०० वाजताच्या सुमारास आरमोरी मार्गे गडचिरोली जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने व्यायाम करत असलेल्या सहा जणांना उडविले. अपघात स्थळावरून ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला आहे.

घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांची अपघात स्थळी गर्दी केली. व काही काळपर्यंत रस्ता अडवून धरला आहे.गडचिरोली पोलीसांना माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळी दखल होत ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य व अधिक तपास सुरु आहे. दरम्यान या अपघातानंतर गडचिरोली व आरमोरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य सरकार कडुन मदत
!!!
राज्य सरकारकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button