चक्काजाम आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग ठप्प, राज्य सरकार व केंद्र सरकारचे वेधले लक्ष
५ तास आलापली- सिरोंचा महामार्ग बंद

लोकशाही न्युज, अहेरी/रेपनपली (दि,९ नोव्हेंबर) संपादक:संदिप कांबळे
दि.९ नोव्हेंबर ला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात सकाळी ७ वाजता विविध मागण्यांसाठी आंदोलनाला नागरिकांसह सुरुवात केली या वेळी आंदोलनाला परिसरातील असंख्य नागरीकानी ठिय्या देत सदर महामार्गावरील वाहतूक जवळ जवळ ५ तास ठप्प करून महामार्ग अडवून धरला.
या वेळी संपूर्ण वाहतूक ठप्प पडली होती या आंदोलनात मुख्य मागणी अहेरी सिरोंचा ३५३ सी या महामार्गाचे दुरवस्था झाली असून मार्गावर मोठं मोठे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न उपस्थित केला होता या वेळी संबंधित विभागातील प्रतिनिधी उपस्थित राहून तोडगा काढण्याच्या प्रयत्न केला परंतु तोडगा निघेना या वेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस विभागा सबंधी प्रश्न उपस्थित केला की अतिदुर्गम भागामध्ये नक्षल कारवाया झाल्या पोलीस विभागाला वेळी मदत मिळणार काय व व अनेक गरोदर माता रस्त्यातच डिलिव्हरी होता है कोणाची जीव जात आहे अनेकांचे हातपाय तुटले अपंगत्व आले याची जवाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर किंवा विभागा संबंधित असलेले अधिकारी घेतील का या प्रश्नावरती संबंधित विभागा कडे उत्तर नव्हते या वेळी आंदोलन स्थळी असलेले नागरिक हे आक्रमक झाले आणि जेव्हा पर्यंत लेखी आश्वासन देणार नाही आम्हाला समाधान करणार नाही तेव्हा पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही वेळी पोलीस विभागाने मध्यस्ती करून आंदोलन शांत केलं.
या वेळी एडसीपीओ सुजित क्षीरसागर आणि पीएसआय गोविंद खटीक यांनी सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार व नागरिक आणि संबंधित विभागामध्ये मध्यस्थि करून येत्या १६ तारखेला काम चालू करून देऊ व संबंधित कामाविषयी काही अडचणी आल्या की आम्ही सहकार्य करू अशी भूमिका घेतली आणि नागरिकांना आश्वासित केले त्या वेळी नागरिकांनी पोलीस विभागावरती विश्वास करून आंदोलन मागे घेण्याच्या निर्धार घेतला व आंदोलन मागे घेण्यात आले पोलीस विभागाने दिलेल्या अश्वासनावरती किती खरे उतरतील हे विशेष.
