एटापल्ली वनरक्षकाला १५ हजाराची लाज घेताना एसीबीने पकडले

लोकशाही न्युज,गडचिरोली/ एटापल्ली (दि,१९ जून)
अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना जप्त केलेल्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई न करताना सोडून देण्याच्या कामासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालाय एटापल्ली येथील वनरक्षकाने तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १७ जून रोजी रंगेहात अटक केली.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखत करण्यात आला आहे. धनीराम अंताराम पोरेटी (३३) असे अटक करण्यात लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे.
वनरक्षक धनीराम पोरेटी याने नदीतील रेतीची वाहतूक करीत असलेल्या दोन ट्रॅक्टर एटापल्ली
नाक्याजवळ पकडल्या. सदर ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशिर कारवाई न करताना सोडून देण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडे ३० हजार लाचेची आहे. मागणी केली. तडजोडीअंती तक्रार १५ हजार देण्याचे मान्य केले. परंतु तक्रारदारास लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
तक्रारीची चौकशी करून १७ जुन रोजी एटापल्ली येथील सेतु दुकानात सापळा रचून वनरक्षक धनीराम पोरेटी यास तक्रार दाराकडून १५ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली.
याप्रकरणी एटापल्ली पोलिस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, नत्थ्थु धोटे,राजेश पदमगिरवार, स्वप्नील बांबोळे, किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदिप उडाण व अंगडवार यांनी केली .
