लोकशाही न्यूज पोर्टल
चिखली | लक्ष्मी गि-हें,
मो. 9322176926
चिखली नगर परिषद अंतर्गत पावसाच्या अगोदर नाल्यांची व रस्त्यांची योग्य साफ सफाई करण्यात न आल्याने रस्त्यावरच नाल्यांचे व पावसाचे पाणी साचून नागरीकांचे दुकानांमध्ये व घरामधे जात आहे. त्यामुळे येण्याजाण्या करीता भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छतेचे तीन-तेरा झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही नगरपालिकेने शहरातील नाल्यासफाई बाबत कुठलीही उपाययोजना केलेल्या नाही. नगरपरिषदेने शहरातील सर्व नाल्यांची व रस्त्यांची. साफ-सफाई करण्यात यावी अशी मांगणी, नागरिकांकडून होत आहे. नगर परिषद चिखली अंतर्गत पावसाळा सुरु झाला, तरी तो कचरा माती उचलून फेकण्यात आलेला नसल्याने पाऊस यामुळे रस्त्यावर खिचडी होऊन येजा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे…..
जाहिरात
