जाहिरात
वडसा शहरविशेष

आजादी का अमृत महोत्सव” निमीत्य देसाईगंज नगर परिषदेतर्फे आयोजित विविध कार्यक्रमांत भाग घेण्याचे पालिकेतर्फे आवाहन

Spread the love

शुभम खरवडे वडसा शहर प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्यास ,दिनांक 15 ऑगष्ट 2021 रोजी 75 वर्षे पुर्ण झालेले आहेत.या गौरवशाली पर्वानिमीत्य, केंद्र शासनाद्वारे “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्याने देसाईगंज नगर परिषदेद्वारा “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याकरीता विविध कार्यक्रमांचे /उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रांगोळी स्पर्धा, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी व विक्री , भिंतीवर चित्र काढणे (वॉल पेंटिंग) व नगर परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत ई. कार्यक्रमांचे समावेश आहे.त्याची रुपरेषा खालिलप्रमाणे आहे.

कार्यक्रमाची थोडक्यात रुपरेषा :-

1) रांगोळी स्पर्धा :- आझादी का अमृत महोत्सव /माझी वसुंधरा/स्वातंत्र्य सेनानी या विषयांवर दिनांक 22/06/2022 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन ते 2.00 वाजेपर्यंत नगर परिषदेचे सांस्कृतिक भवन,नगर परिषद कार्यालयासमोर देसाईगंज येथे रांगोळी काढणे. रांगोळी काढण्याकरीता लागणारे साहित्य व रंग हे स्पर्धकाने स्वत: आणावे . अधिक माहितीकरीता नोडल ऑफीसर श्री. अविनाश राठोड ,लेखापाल मो.क्र.8956743777 व श्री मंगेश नाकाडे कनिष्ठ अभियंता, मो.क्र. 9730635607 यांचेशी संपर्क साधावा.

2) स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची विक्री व प्रदर्शनी :- देसाईगंज नगर परिषद व परिसरातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची विक्री व प्रदर्शनी दुर्गा माता मंदिर परिसर , स्टेट बँकेसमोर येथे दिनांक 25/06/2022 व 26/06/2022 रोजी सकाळी 10.00 सायं.6.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. याकरीता दिनांक 20/06/2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत पुर्व नोंदणी करून घ्यावी. अधिक माहितीकरीता नोडल ऑफीसर श्री. लवकुश उरकुडे, सहायक प्रकल्प अधिकारी मो.क्र. 9921655950 यांचेशी संपर्क साधावा.

3) नगर परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत :- दिनांक 29/06/2022 ला सर्व नगर परिषद प्राथमिक शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याचे सर्व नगर परिषद प्राथमिक शाळेत स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तत्पुर्वी पालकांनी आपल्या पाल्याचे नाव नगर परिषद प्राथमिक शाळेत दाखल करुन घ्यावे. अधिक माहितीकरीता नोडल ऑफीसर श्री. आमनार सर, केंद्र प्रमुख मो.क्र. 8605772028 यांचेशी संपर्क साधावा.

4) भिंती पेंटींग आझादी का अमृत महोत्सव /माझी वसुंधरा/स्वातंत्र्य सेनानी या विषयांवर नगरपरिषदेने नेमून दिलेल्या भिंतीवर पेंटिंग चे आयोजन करण्यात येत आहे.

उपरोक्त सर्व उपक्रमांचा/कार्यक्रमांचा नगर परिषद क्षेत्रातील व परिसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा , असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने ,प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी श्री जे.पी.लोंढे व मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button