आमदार रोहित पवार यांचे कडून अनुप कोहळे आणि मयुर गावतुरे यांचा सत्कार.
गडचिरोली (दि,२१ जुलै)
गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे जलमय होऊन बऱ्याच गावांना स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे बऱ्याच कुटुंबावर उपास मारीची वेळ आली. अश्या परिस्थितीत, जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे आणि युवा सामाजिक कार्यकर्ते मयुर गावतुरे यांच्या संकल्पनेतून #helpGadchiroli हे विशेष अभियान राबवून लोकवर्गणी जमा करून शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन, स्वराज्य फाउंडेशन, द स्ट्रेंथ ऑफ युनिटी, लेजेंड ग्रुप सारख्या अनेक संस्थाच्या माध्यमातून गरजूंना अन्यधान्य किट व इतर जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. ह्या त्यांचा मानवतावादी कार्याला प्रेरित होऊन पुढे देखील त्यांना असे कार्य करण्यास प्रेरणा मिळावी म्हणुन कर्जत जामखेड इन्ट्रीगेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन चे मार्गदर्शक तथा बारामती ऍग्रो चे CEO आमदार रोहित पवार आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
