जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : नगराध्यक्ष पद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ६ ऑक्टोबर)

येत्या काळात महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने महाराष्ट्र राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतीच्या आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

या आरक्षण सोडतीत गडचिरोली नगराध्यक्षपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव जाहीर करण्यात आले. निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागलेले इच्छुक पुरुष उमेदवार यांचा या आरक्षण सोडतीने काहीसा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे.

नगर विकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद व नगरपंचायती च्या आरक्षणाची आज सोडत पार पडली. यात विविध प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व महिला राखीव आरक्षण निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button