जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

मनोरुग्ण तरुणाचा मृतदेह सापडला पाण्याच्या वॉल मध्ये

Spread the love

गडचिरोली ( दि,१० मे)
गडचिरोली शहरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ,गडचिरोली शहराच्या चामोर्शी रोड वरील ( वृदाश्रम ) पाण्याच्या टाकीमध्ये एका ३५ वर्षीय वयोगटातील मनोरुग्ण तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.मृत झालेल्याचे नाव ( योगेश शेषराव देवोजवार वय ३५) रा, स्वामी विवेकानंदनगर गडचिरोली, तो अविवाहित होता, त्याचे मृतदेह चामोर्शी रोडवरील एका पाणी सोडण्याच्या वाल मध्ये सापडला त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली.दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह हा पाण्याच्या वाल मधून काढण्यात आला मृतदेह कुजक्या अवस्थेत सापडला.
तरुण हा मनोरुग्ण असल्याने आत्महत्या केली,मृतदेह कुजक्या अवस्थेत सापडल्याने त्याने आत्महत्या दोन दिवसांपूर्वी केली असावी असा अंदाज आहे, नगर परिषद सफाई कामगारानी त्यांचा मृतदेह त्या वाल मधून काढला व पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे .
मृत झालेली व्यक्ती आपल्या आई ,वडिलांसोबत राहत होता ,व त्याच्या तीन मोट्या बहिणीचे विवाह झाले आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button