जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

शेतकरी पुरुष बचत गटाची मासिक सभा उत्साहात संपन्न .

गटाला दहा वर्षे पूर्ण

Spread the love

गडचिरोली ( दि,९ जून )
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ,थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे गडचिरोली शहरातील शेतकरी लोकांनी एकत्र येऊन १० वर्षांपूर्वी बचत गटाची स्थापना केली होती,बचत ही काळाची गरज झालेली आहे,
बचत करणे म्हणजेच आर्थिक उन्नती व्हावी व बचतीची सवय लागावी या हेतूने बचत गटाची स्थापना केली,बचत गटाची स्थापना म्हणजे केवळ पैसा गोळा करणे हा मुख्य उद्देश
नसून,सामुदायिक भावना वाढीस लागावी,संघटन कौशल्य निर्माण व्हावे हा उद्देश समोर ठेऊन मागील दहा वर्षांपासून बचत सुरू केली आहे,
थोड्याफार पैशासाठी लोकांसमोर हात पसरावे लागते,बँकांचे कर्ज मिळत नाही यातून सुटका करून घेण्यासाठी बचत गट हे प्रभावी माध्यम आहे यामुळे या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते,या बाबींचा विचार करूनच बचत गटाची स्थापना करण्यात आली ,दर महिन्याला या बचत गटाची मासिक सभा होते, गटाचे सभासद सुद्धा मासिक सभेला आवर्जून हजर असतात, जसे मासिक सभा अहवाल,कॅश बुक नोंदी,सभासदांची हजेरी इत्यादी बाबी व सर्वांसमोर हिशोब लिहिला जातो ही बाब विशेष,,
दरवर्षी सर्व १८ सभासद एकत्र येऊन कोणता न कोणता उपक्रम राबवत असतात जसे की,जसे शेतकरी पुरुष बचत गटाची सहल,बचत गटातील सभासदांना चादर व ब्लॅंकेट चे वाटप , सभासदांना लघु कर्ज ,घर बांधकामासाठी कर्ज,वाहन दुरुस्ती साठी कर्ज,खाजगी कामासाठी कर्ज, मोबाईल घेण्यासाठी व मोबाईल दुरुस्तीसाठी कर्ज यासारखे आणखी कृती कार्यक्रम या गटातून राबवले जातात . यापुढे पण गटाचे कार्य वाढत राहणार आहे.
तुलाराम नैताम अध्यक्ष, नरेंद्र पोवनवार सचिव म्हणून बचत गटाचा कारभार पाहत आहेत,तर बसंतसिंग बैस, अनुरथ निलेकार,किशोर खोबरागडे , वासुदेव तडसे, दिनकर धोडरे, रवीद्र कत्रोजवार, कोमेश कत्रोजवार ,अमोल कत्रोजवार, प्रकाश दासरवार, देवा भांडेकर, मोतीराम कंकलवार,मधुकर नैताम,वामन नैताम,दिवाकर सातेलवर,तामदेव महागणकार ,आदी सभासद आवर्जून सभेला हजर होते,,
ही मासिक सभा अनुरथ निलेकार यांच्या राहत्या घरी घेण्यात आली यावेळी गटातील सर्व सभासदांना नाश्ता व चहा ची सोय करण्यात आली,

गट ,, सी.ई.ओ. संदिप कांबळे
👇👇
यापुढे ही हा बचत गट असाच चालू राहील असे मत गटाचे सी.ई.ओ. संदिप कांबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले .
या बचत गटाच्या माध्यमातून सभासदांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार .
या माध्यमातून सर्व सभासदांना कर्जाची सोय करण्यात आलेली आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button