जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

समलैंगिक कृत्यासाठी कपडा व्यापाऱ्यास मोजावे लागले १७ लाख.

गडचिरोली तील धक्कादायक प्रकार

Spread the love

गडचिरोली, (दि,१८) शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला समलैंगिक संबंध ठेवण्याचा छंद जास्तच महागात पडला आहे. त्याच्यासोबत असे संबंध ठेवणाऱ्यांनीच त्याचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्याच्याकडून आधी १७ लाख रुपये टप्प्या टप्प्याने लुटले. पण, त्यांचा पैशाचा लोभ वाढत गेला. त्यानंतर त्यांनी या व्यावसायिकाला २० कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे त्रस्त झालेल्या या व्यावसायिकाने थेट पोलिस स्टेशनला तक्रार करताच या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैशांच्या अतिलोभामुळे अखेर या आरोपींना गजाआड व्हावे लागले.
आलम अन्सारी (वय २४), सत्यम तोमर (वय २५) व दिनेश गायकवाड (वय ३७) सर्व रा. गडचिरोली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील एका व्यावसायिकाचे वर्तन सर्वसाधारण दिसत असले व त्याचे लग्न होऊन मुलेही असली, तरी त्याला समलैंगिक संबंध ठेवण्याची सवय आहे. त्यामुळे त्याने आपल्याच दुकानात काम करणाऱ्या काही पुरुषांसोबत असे समलैंगिक संबंध ठेवले होते. त्याच्या मोठ्या दुकानात नेहमीच ग्राहकांची गर्दी व सीसीटिव्ही कॅमेरे असल्यामुळे हे सारे प्रकार तो त्याच्या एका नव्या निर्माणाधिन इमारतीत तसेच घरीसुद्धा करत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आरोपीं पैकी एक असलेल्या आलम अन्सारी याने २०१९ मध्ये त्या व्यावसायिकाचा एक अश्लील व्हिडिओ तयार केला. आलमने व्हिडीओची माहिती सत्यम तोमर व दिनेश गायकवाडला दिली. या व्यावसायिकाला लुटण्याचा कट त्यांच्या डोक्यात शिजू लागला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिघेही आरोपी या व्यावसायिकाकडे वेळोवेळी पैशाची मागणी करीत होते. तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी या व्यावसायिकाकडून १७.५ लाख रुपयांची रक्कम वसूल केली.
शहरात प्रतिष्ठित व प्रसिद्ध प्रतिष्ठानाचे मालक असलेल्या या व्यावसायिकालाही आपल्या बदनामीची भीती होती. त्यामुळे तो आरोपींनी मागितलेली रक्कम वेळोवेळी निमूटपणे देत होता. अनेकदा त्याच्या दुकानातील काउंटरमधील रक्कमही त्याने या आरोपींना दिल्याचे कळते. या पैशांच्या बळावर आरोपींची चंगळ सुरू होती. आपण मागितले तेवढे पैसे हा व्यावसायिक देत असल्याचे बघून त्यांनी खंडणीची रक्कम वाढवत नेली. ब्लॅकमेलिंगच्या या प्रकारातून सतत रक्कम मिळत असल्याने त्यांची हावसुद्धा वाढत गेली. वाढत्या लोभामुळे त्यांनी त्या व्यावसायिकाला सुमारे २० कोटी रुपयांची मागणी केली. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने व या आरोपींकडून सतत छळ होत असल्याने अखेर या व्यावसायिकाने ९ मे रोजी गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवी कलम ३८४, ३८५ तसेच अश्लील व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपींचे मोबाईल व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिस कोठडीनंतर या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केल्यावर त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अतिलोभात अडकलेले आरोपी सध्या गजाआड आहेत. या प्रकरणाचा तपास गडचिरोलीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम करत आहेत.

आणखी एका मोठया व्यापाऱ्याचा नाव येण्याची शक्यता
👇👇
समलैंगिक वृत्ती असलेल्या या व्यावसायिकाचे बरेच मित्र आहेत. अनेक श्रीमंत, उच्चभ्रू लोकांमध्ये त्याची उठबस आहे. त्यामुळे असे प्रकार तो एकटाच करायचा की, यात त्याला आणखी त्याचे इतर मित्र साथ द्यायचे, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. पण, या दिशेने पोलिसांनी तपास केल्यास या प्रकरणी आणखी काही नावे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button