जाहिरात
आपला जिल्हागडचिरोली

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ठेवावी या मागणीस आम आदमी पार्टी गडचिरोली चा जाहीर पाठिंबा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१४ मार्च)

सध्या सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू ठेवावी यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ पासून सरकारी कर्मचा-यांच्या संघटनानी आपल्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टीचा जुन्या पेन्शन योजने संदर्भातील सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. पंजाबमध्ये निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या आश्वासन दिले होते. आणि सत्तेत येताच पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा पंजाब सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले होते.

२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आलीय. या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. त्यामुळे निवृत्तीपश्चात मिळू शकणारा लाभ हा त्या त्या समयीच्या बाजारस्थितीनुरूप असेल. अर्थात शेअर बाजारातील सरकारी गुंतवणुकीची कशी वाट लागते याचा अनुभव देशाने अनेकदा घेतला आहे. या इतर अनेक कारणांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन योजनेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली चा सरकारी कर्मचा-यांच्या या मागणीला पूर्ण पाठींबा आहे.असे आम आदमी पार्टीचे गडचिरोली जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी कळविले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button