जाहिरात
सावली

जिबगाव येथील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे,

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ग्रा . प . प्रशासनाची बघ्यांची भूमिका

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार.
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

जिबगाव – गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी नाल्याची व्यवस्था केली जाते उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिबगाव येथे सिमेंट कांक्रीट रस्त्यासह नाल्या बांधकाम करण्याचा धडाका सुरु झाला गाव विकासाच्या माध्यमातुन विकासात्मक काम करने योग्य असले तरी विकास कामाला आलेल्या निधीचा योग्य वापर होने गरजेचे आहे केवल थातुरमातुर कामा करने विकास कामाला बाधा पोचविणारे ठरते आणि अल्पावधितच कामाची वाट लागल्या जाते असेच विकासात्मक निकृष्ट दर्ज्याचे काम जिबगाव येथे सुरु असून अश्या गंभीर बाबिकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसते सावली येथुंन जवळच असलेल्या जिबगाव येथे सिमेंट काक्रेट नाली बांधकामाला सुरुवात झाली असून सुनील भोयर ते मायनर पर्यंत २५० मीटर नालीचे बांधकाम सुरु आहे मात्र त्याठीकानी १२ घमेले रेती ; १० गीटी ; १बैग सिमेंट असा वापर सुरु असून नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप ग्रा प सदस्य राकेश गोलेपलीवार यानी केला आहे यां संदर्भात बांधकाम विभागाच्या अधिका ऱ्याशी संपर्क केला असता नालीचे बांधकाम योग्य असल्याचे सबंधित
अधिका ऱ्या कडून सांगण्यात आल्याचे ग्रा प सदस्या चे मत आहे मग नाली बांधकाम कार्यकाळात नालीला भेगा कश्या नालीचे बांधकाम पूर्ण होण्या अगोदर नालीला भेगा जात असतील तर काम योग्य की अयोग्य मात्र बांधकाम अधिकारी ठेकेदाराची बाजू घेऊन काम योग्य असल्याची बतावानी करत असल्याचा ही आरोप ग्रा प सदस्या कडून केला जात आहे १५०० लोकसंख्या असलेल्या जिबगाव येथील ग्राम .प .प्रशासनात काँग्रेस ची एकहाती सत्ता आहे त्यामुळे विकास कामाना गती येत असली तरी होण्या ऱ्या विकासात्मक कामाच्या गुणवतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे आजही गावात समस्या चे डोंगर उभे आहे केवळ नाल्या आणी रस्ते झाले की गावाचा विकास साधल्या जाते का यावरही चिन्तन होने गरजेचे आहे मात्र याकडे ग्राम प प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते निकृष्ट कामाला योग्य असल्याचा दुजोरा प्रशासना कडून दिला जाताना दिसतो कामाचे अल्पावधित वाटोले झाले तरी चालेल त्याना याचे काही घेणे देने नाही कारण आमच्याकडे बहुमत आहे विरोधकाची ही भूमिकाच असते आजही गावात पाणी,स्वछता, आरोग्य आदि समस्या भेङसावत आहेत अशा गंभीर सस्याकडे लक्ष देणे गरजचे आहे पन तसा पर्यन्त होताना दिसता दिसत नाही सर्व ग्रा प कमेटिला विश्वासात घेतल्या जात नाही मनमानी कारभार करुण गावविकासाचे वाटोले करण्याचा प्रकार सुरु असल्याचे दिसुन येत आहे प्रा आरोग्य नविन ईमारती चे बाधकाम पुर्ण होवुन ही लोकार्पण नाही आरोग्य सुरळीत राहावे करीता लाखो रुपये खर्च करुन ईमारत तयार करण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे अशा गंभीर बाबीकडे कानाडोळा अशी धारणा सत्ता धा ऱ्यानची होऊन बसली आहे असा ग्रा प प्रशासनाचा अंधाधुन्द कारभार राहील्यास गावाच्या विकासात्मक मागणीसाठी उपोषनाचा मार्ग पत्करावा लागेल यात शंका नाही .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button