जाहिरात
चंद्रपूरनागभीड

नागभीड वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला गेलेला वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू,

कोसंबी-गवळी बिटातील घटना.

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

नागभिड : आज सकाळी तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धाला वाघाने ठार मारल्याची घटना उघडकीस आली. असुन परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ब्रम्हपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत, नागभीड वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कोसंबी – गवळी बिटातील कक्ष क्रमांक 742 मध्ये तेंदुपत्ता संकलना करिता गेलेला नवेगाव हुंडेश्वरी येथील आडकू गेडाम (65) याला वाघाने ठार मारल्याची घटना आज घडली. याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक के पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन शवविच्छेदनाचा करता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. त्यानंतर पिडीत परिवाराला वन विभागामार्फत तात्काळ आर्थिक मदत करण्यात आली. घटनास्थळी कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असून वन विभागाने त्या परिसरात गस्त सुरू केलेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button