उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
मो.9623494935
सावली- आरोग्य हीच आपली खरी धनसंपदा आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. ही परिस्थती पुन्हा येऊ नये म्हणून राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. आपल्या भागात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅन्सरची सुरुवात व्यसनाने होते. हे व्यसनच आपल्याला मृत्युच्या दारात घेऊन जाते. त्यामुळे नागरिकांनो व्यसनमुक्त व्हा आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.त्यावेळी उपस्थित
सावली नगर पंचायतीच्या अध्यक्षा लता लाकडे,दिनेश पाटील चिटनुरवार . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, नंदू नगरकर, डॉ. प्रकाश साठे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास वाघधरे . डॉ.गोबाडे सर प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव आदी उपस्थित होते.
खर्रा, तंबाखु, बिडी, सिगारेट, मद्य आदी व्यसनापासून तरुणांनी दूर राहावे, आपले आरोग्य सांभाळणे ही आपली जबाबदारी आहे. सद्यस्थितीत उन्हाचा पारा 46 अंशाच्या पार गेला आहे. पुढील महिन्यात हा पारा कितीपर्यंत जातो, माहित नाही. त्यामुळे उन्हापासून स्वत:चे संरक्षण करा. सावली येथे 50 बेडचे हॉस्पीटल मंजूर झाले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून पुढील 2 महिन्यात त्याचे काम सुरू होईल. तसेच डायलिसीस मशीनसुध्दा येथे लावण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी 85 नवीन रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून जिल्ह्यात सध्या 150 च्या आसपास शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका उपलब्ध असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. अत्याधुनिक उपकरणे व रुग्णांना उपचारासाठी सोयीसुविधा देण्याचे काम सुरू आहे. सावली तालुक्यातील 70 गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 45 कोटी रुपये मंजूर झाले असून शुध्द पिण्याचे पाणी सर्व गावांत मिळणार आहे. एकही गाव यापासून वंचित राहणार नाही. कारण आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर पिण्याचे पाणी स्वच्छ असायला हवे.
शिबिरात दिव्यांगाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात मोहन थोरात, सक्षम राऊत, भरत गोहणे, रोहन आवडे, पियुष मेश्राम, उत्तम धुर्वे आदींचा समावेश होता. तर अजय राऊत, रजत गेडाम, सविता रामटेके, गीता गोहने यांना गोल्डन ई – कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरी ऑपरेटेड सायकल देण्यात आली. आरोग्य संदर्भात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली.
