संत शिरोमणी पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 705 व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कुमार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष तेटवार व जिल्हाध्यक्ष एडवोकेट हरीश मंचलवार यांनी विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवून कुंभार समाजाला शिक्षणाचे महत्व,स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले,समाजाने आधुनिकतेचि साथ घ्यावी राजोली,सिंदेवाही,नागभीड,पाहरणी,शंकरपूर,चिमूर येथे आरती साठी आमदार बंटी भाऊ भागडिया यांची प्रमुख उपस्थिती होती, शेगाव, टेंभूरडा, वरोरा, भद्रावती,घुगुस, भेजगाव, विरूर स्टेशन, राजुरा, जिवती, कोरपना, घाटकुळ, सुशी दाबगाव ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पुण्यतिथी उत्सव मध्ये गावभोजन, दिंडी,रथयात्रा, भजन, कीर्तन, महाप्रसाद, काला, घटस्थापना करण्यात आले चंद्रपूर येथील शिवशक्ती चौक, राजीव नगर, चीरखरे विटाभट्टी जवळ , बायपास रोड चंद्रपूर येथे संत शिरोमणी गोरोबा कुंभार काका यांचे जयंतीनिमित्त एडवोकेट हरीश मंचलवार ,महाराष्ट्र कुंभार संघ महासंघ जिल्हाध्यक्ष यांचे नेतृत्वात कार्यक्रम घेण्यात आला, भजन, कला ला, महाप्रसाद त्यादरम्यान भारतीय जनता पार्टी पार्टी चे डॉक्टर मंगेश गुलवाडे महानगर जिल्हा अध्यक्ष, सुभाष तेटवार प्रदेश कार्याध्यक्ष कुंभार महासंघ,भाजपा ब्रिजभूषण पाझारे, महामंत्री भाजपा,तसेच रवी जी गुरनुले महामंत्री भाजपा आणि त्यांची पत्नी नगरसेविका, नगरसेविका जुमडे मॅडम, सुभाष कासनगोट्टूवार भाजप महामंत्री, नगरसेवक,प्रकाश धारणे जिल्हा कोषध्यक्ष भाजपा, पपू देशमुख नगरसेवक, सुरेश पाचरे नगरसेवक, यश बांगडे उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा,यांनी त्या भागात विविध विकास कामांला गती दिल्याबाबत मान्यवरांचे सत्कार सोहळा घेण्यात आला तसेच भजन कीर्तन आणि महाप्रसादाच्या कार्यक्रम घेण्यात आला.
