जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

१८ लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना आले यश.

अटकेत तीन पुरुष व एक महिला

Spread the love

लोकशाही मराठी न्युज पोर्टल

नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके धोडराज हद्दीत दि. २१/०४/२०२२ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना चार जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलिसजवानांना यश प्राप्त झाले आहे.

नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत अशी गोपनिय माहिती पोलीस दलास मिळाल्याने पोलीस दलाकडून पार पाडण्यात आलेल्या अभियाना दरम्यान ०४ जहाल नक्षलींना अटक करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये १) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे वय ३० वर्ष रा. नेलगुंडा ता. भामरागड
२) मा उर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे वय – ३४ वर्ष रा. कनेली ता. धानोरा
३) सुमन उर्फ कोमटी कुड्यामी वय २४ वर्ष पडतमपल्ली ता. भामरागड
४) अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा एटापल्ली जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.

जहाल नक्षली बापु वड्डे हा कंपनी क्र. १० मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता दिनांकऑगस्ट २०२० रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनात सक्रीय सहभाग होता. तसेच त्यांचा ७ खुन, ३ चकमक, १ जाळपोळ, २ दरोडा, एकुण १३ गुन्हयामध्ये समावेश आहे. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. त्यांचा गुन्हयामध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता त्याचा ०३ खून व ०८ चकमक अशा एकुण ११ गुन्हयामध्ये समावेश आहे. एकुण ०३ चकमकी दिनांक १३/०४/२०२२ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जा.) हद्दीमध्ये नामे अशोक विन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या खुनाच्या कटामध्ये जहाल नक्षली मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे व अजित ऊर्फ झारेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांचा सक्रीय सहभाग होता.

नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने ऊर्फ रामजी दोघे वड्डे याचेवर ८ लक्ष रूपये. २) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक स याचेवर ६ लक्ष रूपये. ३) सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी हीचेवर २ लक्ष रूपये व ऊर्फ भरत याचेवर २ लक्ष रुपये असे एकुण १८ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले व्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलिस करत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शना मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस ( अभियान ) श्री. सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक नेतृत्वात पार पडले. अनुज तारे
मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक का अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button