लोकशाही न्युज मराठी पोर्टल..
उमेश गोलेपल्लीवार सावली तालुका प्रतिनिधी..
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा शेती विकास व्हावा, शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने शेती विकासाच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. यासाठी डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करुन विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आव्हान कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. त्या अनुषंगाने मौजा खेडी येथील शेतकरी गुरुदास दादाजी गुरनुले यांनी मागील वर्षी २०२१-२२ मध्ये ४ लाख रुपये खर्च असलेल्या पॅक हाऊस योजनेसाठी अर्ज केला होता. सदर अर्ज माहे फरवरी २०२२ मध्ये मंजूर करुन पॅक हाऊसचे बांधकाम करण्यासाठी २ लाख रुपये अनुदानासह पूर्व संमती दिली.
मंजुरी प्राप्त होताच शेतकरी गुरनुले यांनी पॅक हाऊसचे बांधकाम सावली तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. वाघमारे यांच्या मार्गदर्शनात व कृषी सहाय्यक व्ही. व्ही. साखरे यांच्या देखरेखीखाली व दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण केले. त्या पॅक हाऊसचे उद्घाटन १९ एप्रिल २०२२ रोजी सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी खेडी गावचे प्रथम नागरिक सरपंच म काटपल्लीवार, प्रमुख अतिथी तालुका कृषी अधिकारी सावली अश्विनी गोडसे, माजी तहसीलदार तथा क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक पी.व्ही. कोमलवार, कृषि सहायक व्ही. व्ही. साखरे यांच्या प्रमुख
उपस्थितीत करण्यात आले. पॅक हाऊसचे बांधकाम सुरु असतांना कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व योग्य व मजबूत असल्याची चर्चा केली. गुरुदास गुरनुले यांनी खेडी येथे उभारलेले पॅक हाउस हे पहिलेच असून यापासून खेडीतील शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा देणारे असेल असे मत उद्घाटक प्रसंगी सभापती विजय कोरेवार यांनी व्यक्त केले. तर शासनाच्या अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी सावली अश्विनी गोडसे यांनी चर्चेतून केले. कार्यक्रमाला शेतकरी सुजित पाटील दंडावार, सुरेश अल्लूरवार, पर्यावरण प्रेमी राजू कटकमवार, सुधाकर गेडाम, बुरीवार, विस्तार अधिकारी जीवन प्रधान, कन्ट्रॅक्टर अखिल कोसरे, मारोती नरेड्डीवार, मनाबाई दंडावार आदी उपस्थित होते.
