देसाईगंज-ता.प्र:-
अंकुश पुरी..
जर का कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करीत असतील तर त्यांची जात विचारु नका.कारण समाज हितासाठी कुठल्याही लाभाची अपेक्षा न बाळगता संघर्ष करणारेच खरे देशभक्त असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपजिल्हा प्रमुख नंदु नरोटे यांनी केले.
ते देसाईगंज येथील युवक कॉंग्रेस कार्यालयात क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी देसाईगंज शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पिंकु बावणे, राजेंद्र बुल्ले,नरेश लिंगायत, मंदाबाई पेंद्रे,सुनिता बावणे, संजय बन्सोड,गोपाल दिघोरे,सुनील चिंचोळकर, युवराज उईके,सुनिल सहारे,मिना चौधरी, वैशाली दिघोरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नरोटे पुढे म्हणाले की आपण जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टाचे निवारण करण्याचे मार्ग सापडतील हे ञिवार सत्य तत्कालीन स्थितीत क्रांतिसुर्य ज्योतिबा फुलेंनी सांगितले होते.त्यांनी दिलेल्या विद्येविना मती गेली,मती विना निती गेली,नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्येने केले,या महामंञाणे जागृती झाली.शिक्षण ही काळाची गरज असुन शिक्षणामुळे संघर्ष करण्यास बळ मिळते तर आजच्या स्थितीत सुदृढ समाज निर्मितीसाठी संघर्ष अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे समाज हितासाठी संघर्ष करणारांना सहकार्य करणे तेवढीच काळाची गरज आहे.कारण संघर्ष करणारे हेच खरे देशभक्त असुन संघर्ष हा सर्वांच्या भल्यासाठी असतो असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन भुमित मोगरे यांनी,प्रास्ताविक भारत गराडे यांनी तर आभार प्रदर्शन क्षीरसागर शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
