जाहिरात
क्राईम

हॉटेल वैभव येथील चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१० जानेवारी)

गडचिरोली शहरातील नामांकित हॉटेल वैभव येथे दि, २८ जानेवारी २०२३ रोजी असलेल्या कार्यक्रमानिमीत्त हरीनारायण मंगलप्रसाल पॉल हे त्यांचे परीवार व नातेवाईकांसह हॉटेल वैभव येथे वास्तव्यास असतांना रात्रीदरम्यान एका अनोळखी इसमाने दर्शनी भागात असलेल्या खिडकीतून प्रवेश करुन पाल व त्यांचा परीवार गाढ झोपेत असल्याची संधी साधुन पाल यांचे दोन मोबाईल व दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र असा एकूण ३,८१,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला.

स्थानिक गुन्हे शाखा येथे मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे व त्यांचे पथकाने करण बुधाजी भरलावार रा. चांदली ता. सावली जि. चंद्रपुर यांस गडचिरोली शहरापासून ४ किलोमिटर अंतरावरील माडेतुकुम परीसरातून ताब्यात घेतले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button