जाहिरात
चंद्रपूरसावली

बकऱ्या कोंबड्यावर पाळत ठेवून असलेला बिबट अखेर घरात अडकला.

Spread the love

 

उमेश गोलेपल्लीवार

सावली तालुका प्रतिनिधी..

     सावली तालुक्यातील उसेगाव येथे भगवान आवारी यांच्या घरात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्या घुसला होता. सकाळी 9 च्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश आले. काही दिवस देखरेखीत ठेवून लवकरच त्याची मोकळ्या अधिवासात मुक्तता केली जाईल, अशी माहिती चंद्रपूर वन विभागाचे विभागीय अधिकारी प्रशांत खाडे यांनी दिली.
खाडे यांनी सांगितले की, सावलीपासून सात किलोमीटर अंतर असलेल्या उसेगाव येथे आवारी यांच्या घरी चार जण घरात झोपले होते.पहाटे लघविसाठी भगवान यांची आई सिंधुबाई उठल्या. तेव्हा खाटेच्या खाली काहीतरी असल्याची चाहूल लागली. नेमके काय आहे ? हे बघण्यासाठी त्या गेल्या.मात्र त्याच वेळेस सिंधूबाई यांची सून शशिकला बाई यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार करीत कसेबसे स्वताचा जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडली.खाटेखाली बिबट असल्याचे कुटूंबाचा लक्षात आले. घरात बिबट शिरल्याची उपसरपंच सुनील पाल यांना दिल्या गेली. पाल यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सावली येथील वनरक्षकानी घटनास्थळ घठून पाहणी केली.सकाळी वनविभागाची टीम आणि इको प्रोचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही वेळातच या बिबट्याला पकडण्यात यश आले. मागील काही दिवसापासून हा बिबट गावातील कोंबड्या,बकर्यावर ताव मारीत होता.तो जेरबंद झाल्याने गावकर्यांनी सूटकेचा श्वास घेतला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button