गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना मिळाला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ..
गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांचे संयुक्त विदयमाने जिल्ह्यातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळविणे करीता आत्मनिर्भर होण्याच्या तसेच आश्रम शाळेतील विदयार्थीनींना आत्मसुरक्षेचे धडे देण्याचे उद्देशाने मा.पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थ्याचा निरोप समारंभ तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत शासकीय आश्रमशाळा तोडसा येथील २० विदयार्थीनी करीता आत्मसुरक्षा संबंधिचे १० दिवसांचे स्वयंसिद्ध प्रशिक्षणार्थ्यांचा स्वागत समारंभ असे दोन्ही संयुक्त कार्यक्रम आज दि. ०४.०४.२०२२ रोजी एकलव्य धाम, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पाडण्यात आले.
सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दि.०५.०३.२०२२ ते दि.०४.०४.२०२२ पर्यंत एकूण ३० दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या चौथ्या बॅचमध्ये २०० पुरुष उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला. सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण हे कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून घेण्यात आले. आता पर्यंत घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणा मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकूण ५८० युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला असून प्रशिक्षणा दरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचे वतीने लोअर, टी शर्ट, शुज, लेखी परीक्षेकरीता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आता पर्यंत बीओआय आरसेटी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटीपॉर्लर १०५, मत्स्यपालन ६०, कुक्कुटपालन-३४३, बदकपालन-१०१ शेळीपालन- ६७, लेडीज टेलर ७०, फोटोग्रॉफी- ३५, दु व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण- ३४, फास्ट फुड-३५, पापड लोणचे मसाले प्रशिक्षण, ३०, मधुमक्षिका पालन- ३२, भाजीपाला लागवड १९० तसेच दु व्हिलर व फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण- ३७०, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण-७८० अशा एकूण २२५२ युवक-युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आज रोजी निरोप व स्वागत समारंभ कार्यक्रमास पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले २०० युवक तसेच स्वयंसिद्ध प्रशिक्षणाच्या २० विदयार्थीनी हजर होत्या. या दरम्यान उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त केले तसेच विदयार्थीनीनी कराटे, ज्युडो, मार्शल आर्ट या सारख्या आत्मसुरक्षांचे प्रशिक्षण मिळत असल्याबाबत गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा. श्री. योगेंद्र शेंडे सहा. आयुक्त व श्री. चिमणकर- कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली त्याच प्रमाणे कराटे प्रशिक्षक श्री. योगेश चव्हाण हे उपस्थित होते. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी, कमांडो ट्रेनिंग सेंटर, किटाळी चे सर्व प्रशिक्षक तसेच नागरीकृती शास्त्रेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
