जाहिरात
ब्रेकिंग न्युज

गोविंदपुर येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ डिसेंम्बर)

गडचिरोली मुख्यालयापासून १३ किलोमीटर दूर असलेल्या मौजा गोविंदपुर येथे आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ दुपारी १२:३० ते १ वाजताच्या सुममारास वाघाच्या हल्ल्यात  माया धर्माजी सातपुते रा. गोविंदपुर ता. जि. गडचिरोली (वय ६० ) वर्ष हिचा जागीच मृत्यू झाला, सदर महिला सरपण गोळा करण्यासाठी गावाच्या जवळच गेली असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले आहे.

(छायाचित्रात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेली महिला)

महिलेच्या निधन पश्चात तिचे पती, दोन मुलं, सुना व नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे सातपुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या सदर घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाला  कळविण्यात आली असून वनविभागाची टीम  मौजा गोविंदपूर येथे रवाना झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सातपुते परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी.आणि या परिसरात वावरत असलेल्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी , व परिसरातील जनतेनी केली आहे..

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button