जाहिरात
आपला जिल्हा

२२ जुलै ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत

जिल्ह्यात १ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा करणार शुभारंभ

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२१ जुलै)

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे.

येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी २ वाजता आयोजित या कार्यक्रमाला सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार डॉ. नामदेव किरसान, आ. सुधाकर अडबाले, आ. डॉ. अभिजीत वंजारी, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलींद नरोटे, मा. रामदास मसराम, तसेच अपर मुख्य संचिव(वने) तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलींद म्हैसकर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांनी कळविले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button