नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाची डोळेझाक. नेरी येथील अनु.जाती व नवबौद्ध योजनेचा दुरुपयोग प्रकरण
पंचायत समितीचे दुर्लक्ष.
प्रतिनिधी-प्रवीन वाघे,(दि,४ ऑक्टोंबर)
चिमूर तालुक्यातील नेरी येथे अनुसूचित जाती व नवबौध्द योजनेच्या दुरुपयोग करून व निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या प्रकरणी नागरिकांनी आवाज उठवला त्यासंदर्भात वृत्तपत्रांचे प्रतिनिधीना या प्रकाराची माहिती देऊन विविध वृत्तपत्रात त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली मात्र इतके होऊनही पंचायत समिती मात्र या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे.
नेरी ग्रामपंचायत अंतर्गत विविध समस्या उजेळात येत असतानाच नेरी येथील पेठ विभागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध योजनेचा दुरुपयोग केल्याचा प्रकार समोर आला त्यातच रस्ता बांधकाम करतांना रस्त्या खोदकाम करण्यात आलेला नाही, कोणतेही खडीकरण करण्यात आलेले नाही सोबतच सिमेंट काँक्रिट चे वापर कमी प्रमाणात केल्यामुळे रस्त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे वेळोवेळी नागरिकांनी निरदर्शनास आणून दिले मात्र तरीही पंचायत समिती स्तरावरून कोणतीही कारवाही होत नसल्याने वरीष्ठ अधीकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे बोलल्या जात आहे.
तेव्हा वरीष्ठ अधिकाऱ्यानी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तात्काळ रस्त्याची चौकशी करावी व निकृष्ट बांधकाम करण्याचे बिल मंजूर करण्यात येऊ नये अशी मागणी केलेली आहे.