जाहिरात
गडचिरोली

माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्यात माजी शिक्षकांचा गौरव

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१८ डिसेंम्बर)

स्थानिक शिवाजी हायस्कूलमधील १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आय फार्म गोगाव येथे रंगलेल्या भव्य- दिव्य सोहळ्यात शिक्षक- विद्यार्थी व त्यांचे पाल्य स्नेहमिलन सोहळा आयोजित केला, या सोहळ्यात माजी विद्यार्थ्यांकडून झालेल्या सत्काराने सेवानिवृत्त शिक्षक भारावले. व त्यांचे मन गदगदून गेले.

यावेळी प्रा. जगदीश म्हस्के, प्रा. पुरुषोत्तम निकोडे, प्रा. मुनिश्वर बोरकर, प्रा.पी.पी. म्हस्के, ए.टी. म्हशाखेत्री, अरविंद बळी, सुमती मुनघाटे आदी माजी व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. १० ते १५ वर्षात सेवानिवृत्त होणारे माजी शिक्षक जे आता मरणाच्या दारापर्यंत पोहोचणार, अशा शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करून आमचे आयुष्य पुन्हा १० वर्षे वाढविले, असे आमचे माजी विद्यार्थी जे आता मोठ्या नोकरीवर आहेत.
सत्कारामुळे आम्ही भारावून गेलो, असे भावोद्‌गार माजी प्राचार्य जगदीश म्हस्के यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. याप्रसंगी मुनिश्वर बोरकर, अजय द्विवेदी, दिनेश आकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संचालन अमोल दशमुखे यांनी केले, तर आभार सुधीर चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला माजी शिक्षक, विद्यार्थी व त्याचे पाल्य, अनिल वाघ हे अमरावती वरून तर अजय द्विवेदी हे नागपूर वरून खास उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी अरविंद टिंगुसले, देवा नैताम, सुनील नैताम, गणेश केवटकर, प्रदीप राजुरकर,संतोष विरवार यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवानिवृत्त शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे स्नेहमिलन झाले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button