जाहिरात
गडचिरोली

रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या तिघांना वनविभागाने पकडले

Spread the love

गडचिरोली (१६ जुलै)

रानडुकराची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे ही कारवाई भिकारमौशी ते बोथेडा मार्गावर करण्यात आली.
हेमंत मडावी, डंबाजी जराते, श्याम जराते तिघेही राहणार धुंडेशिवणी तालुका गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत येथील शिकाऱ्यांनी रानडुकराची शिकार करून मास विक्री करण्याच्या बेतात असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला प्राप्त झाली वनक्षेत्र अधिकारी संजय पडवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भिकारमौशी ते बोथेडा या मार्गावर सापळा रचला शिकार केलेले रानडुक्कर घेऊन जाताना तिघांनाही पकडले या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे .
ही कारवाई क्षेत्र सहाय्यक राकेश पांडे,संदीप आंबेडारे ,सिद्धार्थ मेश्राम ,वनरक्षक रुपेश मेश्राम, राजू दुर्गे ,रुपेश आनंद पवार ,गजानन सिडाम यांनी केली आहे .उपवनसंरक्षक मिलिशदत्त शर्मा ,सहाय्यक संरक्षक सोनल बोडके यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button