सिरोंचा उपवनसंरक्षक पूनम पाटे यांना निलंबित करा,संतोष ताटीकोंडावार यांची वनमंत्र्याला दिलेल्या तक्रारीतून मागणी

लोकशाही न्युज, अहेरी/सिरोंचा(दि,६ डिसेंम्बर)
गडचिरोली जिल्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा वनविभागात पुनम पाटे उपवनसंरक्षक हया येथे रुजू झाल्यापासून संपूर्ण वनविभाग कायम विविध कारणांमुळे चर्चेत आहे, येथील वृक्षतोड, सागवन तस्करी, प्राण्यांची शिकार , अवैध गौण खनिजाचे उत्खनन या अश्या अनेक प्रकरणामुळे येथील वनांची, वन्यप्राण्यांची कधीही भरून न निघणारी हानी राजरोसपणे सुरू आहे.
या विभागातील वनांमधून बी एस एन एल ची पाईप लाईन टाकत असताना खोदकाम करण्यात येत होते त्यासाठी हजारो झाडे तोडण्यात आली त्यासाठी वनविभागाची कोणतीही परवानगी नव्हती तरीसुद्धा वनविभागाने त्याविरोधात कोणतीही कार्यवाही केली नाही. गडचिरोली जिल्हाची सीमा दक्षिणेकडे तीन राज्यांना जोडलेली आहे, व प्राणहिता नदी आहे या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन वनातील दुर्मिळ अश्या वृक्षांची, सागवानाची तस्करी नदी मार्गे होत असते, अशी तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून बोटी देण्यात आल्या होत्या परंतु त्याचा कोणताही वापर तस्करी रोखण्यासाठी करण्यात आलेला नाही अनेक वरिष्ठ अधिकारी यांचेकडे या संदर्भात तक्रार करून सुद्धा कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
तसेच काही वर्षा पूर्वी पर्यंत या विभागातील वनांत विविध वन्यजीवांचा सहवास होता, वन्यप्राण्यांची संख्या मोठी होती परंतु शिकारी मुळे वन्यप्राणी संख्या कमी होत आहे याचीही तक्रार वरिस्थाकडे केलेली होती,
अश्या तक्रारी कडे कानाडोळा केल्यामुळे खुप मोठी हानी झालेली आहे, वरिष्ठ अधिकारी पुनम पाटे यांचे या विभागावर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी वनांचे संरक्षण करण्यासाठीचे उपयोजना करत नाहीत त्यामुळे या विभागाशी संबंधित केलेल्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी समिती नेमावी व उपवनसंरक्षक यांना निलंबित करावे,अशी
संतोष ताटीकोंडावार यांनी दिलेल्या आपल्या तक्रारीतून वनमंत्री यांना केलेली आहे.
