जाहिरात
गडचिरोली

११ नोव्हेंबरला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाची जिल्हा स्तरीय बैठक

Spread the love

गडचिरोली (दि,९ नोव्हेंबर)

अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुक्यात काम सुरु असुन अण्णा हजारे यांच्या आंदोलनातुन तयार झालेले ग्रामसभा,माहितीचे अधिकार,दप्तर दिरंगाई,व अन्य जनहितार्थ असलेल्या कायद्याची जनतेमध्ये जागरुकता निर्माण व्हावी व प्रशासनातील मनमर्जीपणा नियमबाह्य कारभार यावर अंकुश ठेवणे व येणा-या काळात लोकायुक्त व जनलोकपाल कायदा तयार होण्या करीता अण्णा हजारे यांचे राज्यव्यापी आंदोलन होणार असुन विविध सामाजिक संघटना व जनतेने आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविण्या करीता शहरी भागापासुन तर ग्रामीण भागा पर्यंत जनजाग्रुती होणे काळाची गरज आहे तसेच शेतक-याना योग्य न्याय मिळावा त्यांचेवर अन्याय होणार नाही या करीता भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन शेतकरी व बेरोजगार युवक,युवतीच्या बाजुने उभा राहील.शासन,प्रशासनात पारदर्शता येण्या करीता जेष्ट समाजसेवक अण्णा हजारेंच्या पविञ विचाराची गरज असुन बैठकी मध्ये कार्यकर्त्याना योग्य मार्गदर्श दिले जाणार या करीता राज्य समिती विश्वस्त डाँ शिवनाथजी कुंभारे तसेच विदर्भातील चंद्रपुर नागपूर,गोंदीया येथील जिल्हाध्यक्ष उपस्थीत राहणार आहेत सदर बैठक शुक्रवार दिनांक ११/११/२०२२ ला दुपारी १२:०० वाजता चंद्रपुर रोड वरील सर्कीट हाऊसला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे.तेव्हा जिल्हाभरातील सर्व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यानी उपस्थीत राहण्याचे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button