वनरक्षकावर कारवाईसाठी आंदोलनाचा दुसरा दिवस

लोकशाही न्यूज गडचिरोली (दि,६ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील आंबेशिवणी येथे ग्रामसभेची परवानगी न घेताच संयुक्त वनसमिती गठित करून गैरव्यवहार केला, या प्रकरणी वनरक्षकावर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी ५ ऑक्टोबरपासून वनसंरक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.त्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही ग्रामपंचायतची उपसमिती असते. समिती स्थापन करताना ग्रामसभेची परवानगी अनिवार्य आहे. परंतु, वनरक्षकांनी पदाचा दुरुपयोग करीत स्वत:च्या मर्जीने कागदोपत्री संयुक्त वनव्यवस्थापन समिती तयार करून पैशाचा दुरुपयोग केला. दुरुपयोग झालेल्या पैशाची तात्काळ चौकशी करावी या मागणी करिता वनरक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.वनरक्षक दुर्गे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी यासाठी ५ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू आहे.
आज दुसऱ्या दिवशी आंदोलन स्थळी योगाजी कुडवे,नीलकंठ संदोकर, आकाश मट्टामी,धनंजय डोईजड, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम,विलास भनारकर आदी सहभागी आहेत. कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा योगाजी कुडवे यांनी दिला आहे.
