जाहिरात
गडचिरोलीसामाजिक

महा अंनिस च्या पाक्षिक सभेत बकरी ईद निमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वितरण करण्याचा निर्णय

१८ जुलै ला होणार साहित्य वितरण

Spread the love

गडचिरोली (दि,८जुलै)
काल दिनांक ७ जुलै २०२२ रोज गुरुवार ला दुपारी चार वाजता कार्मेल शाळेच्या मागे शिव मंदिर येथे महा अंनिस शहर शाखा गडचिरोली ची पाक्षिक सभा आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी मा जयंतराव येलमुले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री भागडकर साहेब उपस्थित होते. या सभेत सदस्य संख्या वाढविण्यासाठी अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी नविन लोकांना जोडण्यासाठी व अंनिसचे कार्य त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सभासद होण्यासाठी प्रवृत्त करून त्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करावा असे ठरविण्यात आले. या सत्रात सभासद नोंदणी करण्यासाठी मा. शब्बीर शेख, विठ्ठलराव कोठारे, पुरुषोत्तम चौधरी, वामनराव भोयर यांनी अथक परिश्रम घेतले तसेच सौ संध्या येलेकर मॅडम यांनी देखील सदस्य नोंदणीत खारिचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यानंतर दिनांक १० जूलै ला येणाऱ्या बकरी ईद निमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देण्याविषयीचा प्रस्ताव मा. शब्बीर शेख यांनी मांडला व त्याकरिता स्वत: वैयक्तिक मोठ्या राशिचा खर्च उचण्याचे कबूल केले तर शहर प्रधान सचिव श्री सुनील नन्नावरे यांनी देखील पाच विद्यार्थ्यांचा खर्च उचलण्याचे मान्य केले. सभेमध्ये उपस्थित सभासदांनी सुद्धा स्वेच्छेने वर्गणी देण्याचे आश्वासन दिले. मुस्लिम समाजातील गरजू विद्यार्थ्यांसोबत इतर समाजातील विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी वस्तू द्यायचे ठरल्याने अंनिसच्या इतर सभासदांनी देखील स्वेच्छेने वर्गणी देण्याचे व गृप मधील जे कोणी स्वेच्छेने वर्गणी देतील त्यांच्या कडून घेतल्याचे ठरविण्यात आले. वस्तू वितरणाचा कार्यक्रम दिनांक १८ जूलै ला घेण्यात येणार आहे करीता ज्या सदस्यांना वर्गणी द्यायची असेल त्यांनी दिनांक १२ जूलै पर्यंत आपली वर्गणी महा अंनिस शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांकडे गोळा करावी म्हणजे जमा झालेल्या पैशात किती मुलांना व काय काय देता येईल याचे नियोजन करणे सोपे जाईल. सभेला श्री विलास निंबोरकर राज्य सहकार्यवाह वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प, विठ्ठलराव कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष, गोविंदराव ब्राम्हणवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, पुरुषोत्तम चौधरी जिल्हा प्रशिक्षण विभाग, लहुजी रामटेके शहर उपाध्यक्ष, विलास पारखी जिल्हा प्रधान सचिव, कमलाकर वारके शहर उपाध्यक्ष, वामनराव भोयर सदस्य, श्री सुनील नन्नावरे शहर प्रधान सचिव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री शब्बिर शेख शहर अध्यक्ष यांनी तर आभारप्रदर्शन श्री सुनील नन्नावरे शहर प्रधान सचिव यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button