जाहिरात
गडचिरोलीसामाजिक

गुरुदेव सेवा मंडळ शाखा खरपुंडी कार्यकारणीचे पुनर्गठन..

ग्रामसेवाधिकारी पदी वाल्मिक वासेकर

Spread the love

लोकशाही मराठी न्युज पोर्टल…
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर गडचिरोलीचे वतीने खरपुंडी येथील हनुमान मंदिरात ग्रामजयंतीनिमित्त विशेष सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, मुख्य सचिव पंडित पुडके, ग्रामसेवाधिकारी सुखदेवजी वेठे, आजीवन प्रचारक आत्माराम आंबोरकर, उपाध्यक्ष अनिल धात्रक, देविदास टिकले, सुखदेव नैताम, ऋषीजी मोटघरे, किशोर खोबरागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे यांनी प्रास्ताविकेतून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महान कार्याची माहिती देऊन ग्रामजयंती साजरी करण्याचा उद्देश विषद केले.
ग्रामगीताचार्य बंडोपंत बोडेकर यांनी वंदनीय तुकडोजी महाराजांनी मनुष्याच्या अंगी मानवता धर्म निर्माण होण्यासाठी ग्रामगीता प्रकाशित करून लोकांना उपदेश दिले. त्यांच्या महान कार्याचा वारसा चालवण्यासाठी नवीन पिढीला माहिती देण्याच्या दृष्टीने दरवर्षी ग्राम जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. रामनगर शाखेने हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.
जिल्हा सेवाधिकारी डॉ शिवनाथजी कुंभारे यांनी ग्राम जयंतीनिमित्त गावात स्वच्छता मोहीम राबवावी गावातील जनतेने बिडी, तंबाखू, सिगारेट, खरा, दारू या व्यसनापासून दूर राहून आपले शरीर निरोगी ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी खरपुंडी येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे यांनी यादीचे वाचन करून पुढील प्रमाणे कार्यकारिणी घोषित केली.
ग्रामसेवाधिकारी पदी वाल्मीक वासेकर, उप ग्रामसेवाधिकारी हिराजी निकोडे, सचिव रविशंकर भांडेकर, सहसचिव रोहित बुरांडे, कोषाध्यक्ष गजानन बुरांडे, सहकोषाध्यक्ष राजेंद्र उसेंडी आणि सदस्य म्हणून प्रमोद भांडेकर, मंगल गुरनुले, छत्रपती सोनुले, प्रल्हाद जुमनाके, राजेंद्र जुमनाके, पंकज जुवारे, युवराज भांडेकर, निशा बुरांडे, मंजुबाई टिकले, सोनी वासेकर, सुषमा बुरांडे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून डॉ कुंभारे आणि मान्यवरांच्या हस्ते ग्रामगीता आणि प्रार्थनेची वही देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी मारोतराव उईके कोषाध्यक्ष, उपग्रामसेवाधिकारी मधुकर भोयर, तडसे सर, भास्कर नैताम, गायत्री चलाख, तनवी मरापे, वर्षा भांडेकर, मोहिनी वासेकर, करिष्मा बुरांडे, नितेश बुरांडे तसेच गावातील नागरिक व गुरुदेव सेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रचारक दिलीप मेश्राम आणि प्रार्थनेचे संचालन सचिव कवडूजी येरमे तर आभार प्रदर्शन वाल्मिक वासेकर यांनी केले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button