जाहिरात
गडचिरोली

आर.टी.ओ कार्यालयाचा ३६ वा वर्धापन दिन साजरा

बसंतसिंग बैस व अनुरथ निलेकार यांची हजेरी

Spread the love

गडचिरोली (७ मे ) उप. प्रादेशीक परिवहन कार्यालय गडचिरोली च्या ३६ वा वर्धापन दिन अण्णा हजारे विचार मंच व रस्ता प्रवासी जीव सुरक्षा विचार मंच जिल्हा गडचिरोली चे संयुक्त विद्यमाने ६ मे रोजी विजय चव्हाण उ. प्रा. प. अधिकारी, यांचे हस्ते केक कापून साजरा करण्यात आला . विजय चव्हाण यांचे स्वागत विचार मंचचे जिल्हा प्रमुख बसंतसिंह बैस यांनी शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मोटार वाहन निरिक्षक सी. टी. पाटील, श्रीमती उगावकर, एस.वाय. जमखंडीकर, उपनिरिक्षक एच. डब्लू.गावडे, के.एस. परी, एच सी. काळे, जी. एस. खरावे. पी. डी. येवले तसेच वरीष्ठ लिपीक हर्षल बदकल, श्रीमती चौहान, मॅडम सिटीक, ए के कांबळे, पी. पी काळबांदे ए.व्ही. दूपारे, ही दांडवे, ए. बी घोटकर, एस. एम बोंडे.डी.आर. मारकर,अण्णा हजारे विचार मंच चे पदाधिकारी अनुरथ निलेकर ,देवेंद्र ब्राह्मणवाडे सचिव ,तुलाराम नैताम, कोमेश कत्रोजवार, प्रविण डोर्लीकर, रमन बैस, राजू ठाकरे यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

विजय चव्हाण यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले, माझ्या संपूर्ण सेवा काळात गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्हातील विचार मंच ने आरटीओ कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा करताना प्रथमच अनुभवात आले. आर. ओ कार्यालया च्या बाबतीत बहुताश लोकांच्या मनात वेगळीच मानसिकता बिबलेली असते. विचार मंचाचे पदाधिकारी नेहमी कार्यालयात येऊन अधिकारी कर्मचा-याचे मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार निवेदन देऊन कामातील सुधारणा तसेच कर्तव्याप्रती जाणिव करून घेतात ही अतिशय चांगली बाब आहे कार्यालयातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी चांगले कामे करीत आहेत. कोणाच्याही विरुद्ध तक्रारी झालेल्या नाही ही चांगली गोष्ट आहे .
वरिष्ठ लिपीक हर्षल बदखल व मोटर वाहन निरिक्षक एच.डब्लू गांवडे, निरिक्षक सी. टी. पाटील, एस. वाय जमखंडीकर यांनी आपल्या कर्तव्य व जबाबदारी आणि लोकसेवा याविषयी आपले मनोगत व्यक्त करतांना विचार मंचाचे बसनसिंह बैस यांनी भविष्यात शुद्ध आचार, विचार सहनशीलता, समर्पण या पाच तत्वाचे पालन करून जनसेवा करावी आपल्या आयुष्यात चांगली कामे करून निर्माण व्हावे असा सल्ला दिला त्यांच्या या विचाराचे आम्ही नेहमी पालन करण्याचा प्रयत्न करित असे सांगीतले विचार मंच च्या पदाधिकाऱ्या कडून मिळणारे सहकार्य व मार्गदर्शन अंत्यत मोलाचे असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन ,आभार व समापन हर्बल बदकल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी देवेंद्र ब्राम्हणवाडे, अनुरथ निलेकर, राजू नकरे, रमण बैस यांनी मोलाचे सहकार्य केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button