जाहिरात
निधन वार्ता

अपघातात पोलीस शिपायाचे निधन

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,१६ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे

चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं. २ येथील रहिवासी असलेले प्रणय वाळके वय २८ हे स्वगावावरुन कर्तव्यावर गडचिरोली कडे जात असतांना चामोर्शी तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या अड्याळच्या वळणावर सकाळी ११ वाजता च्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकी क्रं एम. एच. ३३ एन ०१५९ ला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार पोलीस प्रणय वाळके रा. मुधोली चक २ यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पूर्ण मेंदूच बाहेर पडला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची पोलीसांना माहिती मिळताच आष्टी पोलीस व चामोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी चामोर्शी रुग्णालयात पाठविण्यात आले. अज्ञात वाहनाविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

त्या पोलीस शिपायाच्या मृत्यू पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील व बराच आप्तपरिवार आहे. त्याच्या या अपघाती निधनानंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्या मृतक पोलीस शिपायाच्या पार्थिव शरीरावर पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे सलामी देण्यात आली व त्याचे मृतदेह गावाकडे अंतिम संस्कारासाठी नेण्यात आल्याची माहिती आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button