सिंदेवाही व सावली क्षेत्रात वाघाच्या दहशतीचा बंदोबस्त करा.खा.अशोकजी नेते.
सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा येथे वाघाने ठार केलेल्या हल्ल्यातील कुटुंबीयांची भेट व सांत्वन
उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत चिकमारा, तांबेगडी मेंढा येथे पट्टेदार वाघ आणि बिबट्याचा वावर आहे. चिकमारा गावाच्या लागत झुडपी जंगल असून दिनांक २७/४/२०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रौ १२ वाजता. घरात झोपून असलेल्या तुळसाबाई परसराम पेंदाम वय. ७५ हिला वाघाने हल्ला करून जीव घेऊन शिकार केल्यामुळे परिसरात चांगलीच दहशत पसरलेली आहे. या गावालगत जंगल परिसर विस्तीर्ण आहे. सोबतच जंगल मोठ्या प्रमाणात आहे. आणि या जंगल परिसरात वाघाने धुमाकूळ घालत असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी सूचना खा.अशोकजी नेते यांनी केले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री, अनु.जनजाति मोर्चा.यांनी चिकमारा येथे वाघाने शिकार केलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबियांचं सांत्वन केले.
त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अविनाश पाल, स्वप्निलभाऊ वरघंटे प्रदेश सदस्य युवा मोर्चा, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश पा.गड्मवार, किशोरजी लोणारे, भाजपा कार्यकर्ता प्रमोद ठाकरे, योगेन्द्र पेंदाम, देवाजी पेंदाम, एच. एल.सोरते वनरक्षक तसेच गावातील व्यक्ती उपस्थित होते
