२३ डिसेंबरला “आप” चा मोर्चा धडकणार विधानसभेवर मोर्चात सहभागी होण्याचे बाळकृष्ण सावसाकडे यांचे आव्हान

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,२१ डिसेंम्बर)
राज्यात गेल्या ४ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले शिंदे, फडणवीस सरकारच्या असंवेदनशील कारभारामुळे शिक्षण, निवारा, वीज, सरकारी नोकऱ्या, शेतकरी – शेतमजूर व शेती, इत्यादी क्षेत्रातील दैनंदिन प्रश्न सुटणं कठीण झालं आहे. या संदर्भात सोमवार दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी आम आदमी पार्टीच्या राज्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी जिल्हाधिकारी, व तहसीलदारांना निवेदन देऊन विविध मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली होती.

(आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक बालकृष्ण सावसाकडे यांचे मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन)
या मागण्या घेऊन आम आदमी पार्टी महाराष्ट्रातर्फे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानसभेवर शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर, २०२२ रोजी “महामोर्चा” आयोजित केला आहे. जिल्ह्यातील,सर्व तालुका, आणि शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी,शेतकरी,मजूर या “महामोर्चा” मध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आम आदमी पार्टी गडचिरोली जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी आव्हान केले आहे.
