जाहिरात
गडचिरोलीराजकीय

चुकीच्या प्रचाराला ताकतीने उत्तर देवून जनतेला सत्य पटवून सांगा,आमदार डॉ.देवराव होळी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १२ ऑगस्ट)

राज्यातील भाजप व महायुतीचे सरकार आल्यापासून जनतेच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या योजना राबवित आहे. आपणही आमदार म्हणून मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामे केलेली आहे. मात्र त्या योजनाबाबत अपप्रचार करून जनतेला त्यापासून वंचित ठेवण्याचा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेला असून भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या चुकीच्या अपप्रचाराला तेवढ्याच ताकतीने उत्तर देत सर्वसामान्य लोकांना आपण केलेली कामे व शासनाच्या योजनांची सत्यता पटवून सांगावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली भाजपा तालुका कार्यकारणीच्या बैठकीच्या प्रसंगी केले.

गानली सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला तालुक्यातून अपेक्षित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.

बैठकीला माजी आमदार नामदेवराव उसेंडी, जेष्ठ भाजपा नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे रमेश भूरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल पोहनकर यांनी मार्गदर्शन केले .

यावेळी मंचावर जिल्ह्याचे महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडी जिल्ह्याच्या अध्यक्षा गीता हिंगे, डॉ. चंदा कोडवते, डॉ.नितीन कोडवते, तालुका महामंत्री आकाश निकोडे, रमेश नैताम ,देवानंद चलाख, मारोती कोलते प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विलास भांडेकर,संचालन माजी उपसभापती विलास दशमुखे, शोक प्रस्ताव तालुका महामंत्री आकाश निकोडे, यांनी तर आभार प्रदर्शन महामंत्री बंडू झाडे यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button