जाहिरात
दैनंदिन बातम्या

बि.एस.एन.एल.टॉवरची नेटवर्क क्षमता वाढवा,सचिन भुसारी यांची निवेदनातुन मागणी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१ ऑगस्ट)

गडचिरोली मुख्यालया पासुन २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरमाडी या गावी मागील वर्षापासून बि.एस.एन.एल. ची नेटवर्क सुविधा सुरु करण्यात आली त्या सुविधेचा फायदा घेत मुरमाडी परिसरातील बि.एस.एन.एल. च्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परंतु आता इंटरनेट सेवा मोबाईलवर सुद्धा नसल्याने ई-पीक पाहणी अँपद्वारे तसेच माझी शेती माझा फेरफार या घोषणा वाक्याचा आधार घेत असतांना लोकांसमोर अडचण निर्माण होत आहे.

त्याचप्रमाणे शासनाने जरी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ई-शिक्षण प्रणाली पद्धत इंटरनेट द्वारे सुरु केली असली तरी शैक्षणिक तंत्र विज्ञानात विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक उपाय योनक अपद्वारे खेडोपाड्यांत अध्यापकविना अध्यापन करणे विद्यार्थ्यासमोर इन्टरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने डिजिटल ई-शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठी समस्या निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये नेटवर्क टॉवर उपलब्ध असतांना सुध्दा नेटवर्क नसणे यामुळे येणारे जाणारे कॉल सुध्दा लागत नाही व समाधनकारक संभाषण होत नसल्याने बि. एस. एन. एल.ग्राहकासमोर मोठी अडचण तयार झाली आहे.

तरी ही समस्या लक्षात घेता तात्काळ मुरमाडी येथील बी.एस.एन.एल.टॉवर ची नेटवर्क क्षमता वाढवून समस्या सोडवावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून सचिन भुसारी यांनी जिल्हा व्यवस्थापक, भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय गडचिरोली यांना केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button