चामोर्शी (दि,१७ नोव्हेंबर)
स्थानिक केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयात बीकॉम द्वितीय वर्षात शिकत असलेला सचिन रोहनकर याने बुलढाणा मेहकर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय रस्साखेच स्पर्धेत सहभागी झाल्यावर त्याची हरियाणा कुरुक्षेत्र येथे पार पडलेल्या 35 व्या वरिष्ठ 640 किलो वजन गटातील राष्ट्रीय रस्साखेच ( टग ऑफ वॉर )या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातर्फे निवड झाली .
नुकत्याच हरियाणा कुरुक्षेत्र येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गडचिरोली जिल्यातून सहभागी होणारा सचिन रोहनकर हा पहिला खेळाडू ठरला याचे विशेष कौतुक आहे .
सचिन रोहनकर च्या राष्ट्रीय स्तरावरील रस्साखेच स्पर्धेतील सहभागा मुळे गडचिरोली जिल्ह्यात टग ऑफ वॉर या खेळास भरपूर प्रसिद्ध मिळून हा खेळ जिल्यात प्रचलित होईल असा विश्वास प्रशिक्षक प्रा डॉ महेश जोशी यांनी व्यक्त केला.
सचिन रोहनकर याला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे चंद्रपूर जिल्हा रस्साखेच असोसिएशनचे सचिव प्रा विकी पेटकर यांचे महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहे .
सचिन रोहनकर याच्या या उपलब्धी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ हरडे ,सचिव सौ डॉ स्नेहा हरडे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
