जाहिरात
अहेरीगडचिरोली पोलीस

जिमलगट्टा उपविभागातील नागरिकांकडुन २० भरमार बंदुका पोलीसांचे स्वाधिन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ डिसेंम्बर)

२ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताह दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन, उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी २० भरमार बंदुका पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र असल्यामुळे येथील दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करुन उदरनिर्वाह करीत असत. शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागात नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवुन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांचे संकल्पनेतुन नागरिकांनी स्वतःजवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते. गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील नागरिकांनी त्यांचेकडे बाळगलेल्या २० भरमार बंदुका दिनांक- ८ डिसेंबर २०२२ रोजी उपपोस्टे दामरंचा येथे पोलीस दलाच्या स्वाधिन केल्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button