समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले देसाईगंज येथे गोंदिया बल्लारशाह पॅसेंजर ट्रेन चे स्वागत.
चक्काजाम आंदोलनाला आले यश
देसाईगंज–
भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि समाजवादी पार्टी च्या वतीने गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गावर कोरोणा काळापासून बंद पडलेली प्यासेंजर ट्रेन च्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात तसेच सकाळील बल्लारशाल-गोंदिया ट्रेन नागरिकांच्या सुविधेचा विचार करून सुरू करण्यात यावी या प्रमुख मागण्याना घेऊन देसाईगंज येथील रेल्वे स्टेशन जवळ लाखांदूर टी पॉईंट वर भाकपा आणि समाजवादी पार्टी च्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आला होता यात बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते सदर आंदोलनाची दखल घेत 5 एप्रिल पासून गोंदिया-बल्लारशाह मार्गावर सकाळी आणि सायंकाळी प्यासेंजर ट्रेन सुरू करण्यात आली आहें एकूणच सदर भाकपा आणि समाजवादी पक्षाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहें आज देसाईगंज तालुका समाजवादी पार्टी च्या वतीने बल्लारशाह वरुन सकाळी 9 वाजता देसाईगंज येथे प्यासेँजर ट्रेन चे आगमन होताच समजवाद्यानी अनंदोस्तव साजरा करत ट्रेन च्या पायलट ला हार घालून शुभेच्छा दिल्या या वेळे तालुका अध्यक्ष खेम्राज नेवारे,शहर अध्यक्ष नरेश वासनिक, लता मेश्राम, सचिव तवंगर कुरेशी, प्रसीधी प्रमुख जीब्राइल शेख,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सपना आत्राम, जिल्हा सदस्य मुजीब शेख,खलील खान,अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष असलम शेख,सचिव समीर शेख,पुषा बोदेले,तुषार रहाटे तसेच बहुसंख्य समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
