जाहिरात
गडचिरोलीदिन विशेष

डॉ.ए.पि.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमीत्याने विदयार्थ्यांनी साकारली मिसाईलची प्रतिकृती.

Spread the love

गडचिरोली(दि,१५ ऑक्टोंबर)

गडचिरोली शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली येथे आज दि. 15/10/2022 रोजी डॉ.ए.पि.जे अब्दुल कलाम यांच्या जंयतीचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका. डी. एच. जुमनाके मैडम यांनी डॉ.ए.पि.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी वाचन प्रेरणा दिन घेण्यात आला तथा विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.

(विद्यार्थ्यांनी साकारली मिसाईल प्रतिकृती)

श्री.व्हि.आर. मडावी माध्य. शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10 वी च्या विदयार्थ्यांनी
मिसाईलची प्रतिकृती तयार केली मिसाईलच्या प्रतिकृतीच्या माध्यमाने डॉ.ए.पि.जे. अब्दुल
कलाम यांना अभिवादन केले.

यावेळी जागतिक हात धुवा कार्यक्रम व इतर स्वच्छते विषयक मार्गदर्शन कु. संगीता मोडक प्रा. शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता श्री. डोंगरवार सर, श्री. राठोड सर, श्री. पिलारे सर, श्री. पेन्दाम सर, श्री. कारेकर सर, श्री. सातपुते सर. कु. बॉनाईत मॅडम, कु. बारसागडे मॅडम, श्री. साईनाथ सिडाम, कु.टेकाम ताई यांनी प्रयत्न केले. तर अधिक्षक अखिल आर. काळे व अधिक्षिका कु. सुनीता झाडे यांनी विदयार्थी व मार्गदर्शकाचे कौतुक केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button