जाहिरात
गडचिरोलीविशेष

गडचिरोली शहरातील स्वस्त धान्य दुकानातील धान्याचे वितरण स्थानिक वार्डातच करा

कमलकिशोर खोबरागडे यांची मागणी

Spread the love

लोकशाही मराठी न्युज पोर्टल…

सर्वसामान्य जनतेला त्यांचा राशन वेळच्या वेळी बरोबर मिळावा याकरीता सरकारी स्वस्त धान्य दुकानांमार्फत राशनचे दरमहा वाटप करण्यात येते. नियमित कार्डावरील धान्यासोबत कोरोनाचे काळात मोफत राशन सुध्दा देण्याची सुविधा तयार झाली आहे. प्रत्येक वार्डाचे स्वस्त धान्य दुकान त्या त्या वार्डात असणे आवश्यक आहे. तेव्हाच कार्डधारकांना त्यांचा राशन सहज प्राप्त करता येईल. जिल्हा सार्वजनिक वितरण विभागाकडून तशी तरतूद केली आहे. असे असतांना गडचिरोली शहरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकान हे मागील दहा वर्षापासून स्थानिक वार्डापासून बरेच लांब अंतरावर आहेत. त्यामुळे कार्डधारकांना आपले धान्य आणण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

काही दुकाने तर स्थानिक वार्डापासून 1 ते 2 किलोमिटर अंतरावर आहेत. हे वास्तव आहे. बरेच कार्डधारकांकडे वाहनाची सोय नाही. डोक्यावर 30 किलो धान्याचे ओझे घेवून इतके लांब अंतर ते चालु शकत नाही. काही कार्डधारक वयाने थकलेले आहेत त्यांना तर जाण्यायेण्यातच बराच वेळ घालवावा लागतो आणि त्यातही दुकान सुरू आहे की नाही याची शाश्वती नाही. अशावेळी कार्डधारकांनी काय करावे? या सर्व व्यवस्थेचा गोरगरीब लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सर्वसामान्य कार्डधारक साधी तक्रारसुध्दा करू शकत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे सुध्दा माहित नाही मग तो चुपचाप बसण्याशिवाय काय करणार? त्या-त्या वार्डातील स्वस्त धान्याचे दुकान स्थानिक पातळीवर त्याच वार्डात उपलब्ध असल्यास कोणालाही त्रास होणार नाही.

तालुक्यातील पुरवठा निरीक्षक तसेच तहसिलदार यांनी याबाबत कधीच चौकशी केली नाही. लोकांना किती त्रास होतो हे कधी येवून पाहिले नाही. पुरवठा अधिकारी यांना मेल अथवा पत्र पाठवूनही ते बघत नाहीत. केवळ धान्याचे नियतन आणि वितरण करणे आणि खराब मालाचा पुरवठा करणे ऐवढेच काम त्यांचेकडे उरले आहे.

तालुका व शहर दक्षता समिती केवळ बोर्डावर लटकलेली आहे. त्यांना त्यातले काहीच समजत नाही. या सर्व गोष्टींचे वास्तव पाहता तहसिलदार तसेच पुरवठा अधिकारी यांनी या समस्येकडे लक्ष देवून व योग्य ती चौकशी करून प्रत्येक वार्डात धान्य वितरणाची सोय करून देण्यात यावी अशी मागणी श्री. कमलकिशोर खोबरागडे यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button