माझ्या मुलीची आत्महत्या नसून खुनच
न्यायासाठी मृतक तरुणीच्या आईची पत्रकार परिषदेतुन मागणी

लोकशाही न्यूज, चामोर्शी (दि. ९ सप्टेंबर)
दि. ९ जून २०२५ च्या मद्यरात्री माझ्या मुलीने मृतक तरुणीचे नाव कु.अंजली राजु खडसे हिने विहिरीत उडी घेऊन मरण पावली असे म्हणण्यात येत आहे पण माझ्या मुलीने आत्महत्या न करता तिला मारून विहिरीत ढकलण्यात आले व तिने आत्महत्या केली असे भासविण्यात आले आहे. तरी त्या घटनेचा पोलिसांनी तात्काळ शोध लावून आरोपीना जेरबंद करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज (दि. १० सप्टेंबर) ला प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मृतक तरुणीची आई सुरेखा राजु खडसे वय ५० वर्षे हिने केली आहे.
आष्टी पोलीस स्टेशन कडुन झालेल्या घटनेला व आम्ही दिलेल्या तक्रारी ला ३ महिने उलटूनही पोलिसांनी अजून तपास पुर्ण न करता केवळ चालढकल करून वेळ काढत आहेत असाही आरोप करण्यात आला.माझ्या मुलीशी अनुराग कन्नाके रा. मुल जि चंद्रपूर या मुलाचे प्रेम संबंध होते व त्यानेच तिला घरा बाहेर नेऊन, आष्टी पासुन १० किलोमीटर दूर असलेल्या कोनसरी येथील वनविभागाच्या विहिरीत तिला मारून फेकले.व मृतक तरुणीने आत्महत्या केली असा बनाव केला. पोलिसांनी झालेल्या सदर घटनेचा तपास न करता आम्हाला न्याय मिळवून न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मृत्तकाची आई सुरेखा खडसे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला मृतक तरुणीची आई सुरेखा खडसे, नामदेवजी शेडमाके संघटन महामंत्री गोंडवाना गणतंत्र पार्टी, दिवाकर पेंदाम, प्रशांत मडावी, भीमराव मेश्राम, अंकुश वाघमारे, विनोद आत्राम मृतक तरुणीचा मामा, समय्या पसूला माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, वसंत कुलसंगे, शांताबाई येरमे हजर होते.
