जाहिरात
गडचिरोलीविशेष

महा अंनिस शाखा गडचिरोली तर्फे शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांची जयंती संपन्न.

Spread the love
गडचिरोली (दि,२ नोव्हेंबर)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीचे वतीने आरमोरी रोडवरील परिश्रम निवास येथील महा अंनिस कार्यालयात समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष पद्मभूषण शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांची  जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाखेतील जेष्ठ कार्यकर्ते तथा जिल्हा निधी व्यवस्थापक श्री गोविंदराव ब्राम्हणवाडे उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून तर डॉ दाभोळकरांच्या बलीदानापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कार्याच्या आठवणी यावेळी उजागीर करण्यासाठी महा अंनिस चे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, शहर कार्याध्यक्ष श्री दामोधर ऊप्परवार शहर सहसचिव श्री उपेंद्र रोहनकर यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. जिल्हा सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह श्री पुरुषोत्तम ठाकरे यांनी डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या  कार्याची महती सांगणारे अभिवादन गीत सादर केले. संचालन जिल्हा प्रशिक्षण विभाग कार्यवाह श्री पुरुषोत्तम चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा प्रकाशने वितरण विभागाचे कार्यवाह श्री सुधाकर दुधबावरे यांनी केले.
जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button